गुवाहटी | पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असून नागरिकत्व विधेयकाचा विरोध करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तसेच मोदी गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. नरेंद्र मोदी ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत.
केंद्र सरकारनं लोकसभेत नागरिकत्व विधेयक जानेवारी महिन्यात मंजूर केले होते. ईसान्य भारतातील राज्यांचा या विधेयकाला विरोध आहे.
गुवाहटी मध्ये क्रिषक मुक्ती संग्राम समितीनं नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवले यानंतर मॅकहोवा परिसरात (AJYCP) च्या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील विविध विकासकामांच उद्घाटन आणि पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!
–मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
–नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!
–“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”
–बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी