Black Magic | कर्नाटकातील (Karnataka) बेल्लारी (Bellary) शहरातील कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या (Karnataka Milk Federation – KMF) प्रशासकीय कार्यालयासमोर (Administrative Office) काही अज्ञात लोकांनी (Unknown Persons) जादूटोणा (Black Magic) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे KMF चे कर्मचारी भयभीत झाले आहेत. हा जादूटोणा कोणी आणि केव्हा केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
KMF तोट्यात (Loss) चालत असल्याने कार्यालयातील 50 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासाठी शॉर्टलिस्ट (Shortlist) करण्यात आले आहे. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी हे कृत्य केले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यालयासमोर आढळल्या गूढ वस्तू
ही घटना कर्नाटक मिल्क फेडरेशन कार्यालयासमोर घडली. कार्यालयासमोर एक काळी बाहुली (Black Doll), मोठा भोपळा (Pumpkin), नारळ (Coconut), 8 लिंबू (Lemons), केसर (Saffron) आणि त्यावर लाल शेंदूर (Vermilion) आढळून आले. हे दृश्य पाहून कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कार्यालयासमोरील जी छायाचित्रे (Photos) समोर आली आहेत त्यात एका मोठ्या भोपळ्यात पाच खिळे (Nails) ठोकल्याचे दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीही नाही
एका छोट्या मशीनभोवती (Machine) धागा (Thread) गुंडाळून, नारळात ताबीजची (Amulet) पिशवी बांधून, एक बाहुली ठेवून आणि दुसऱ्या झाकणावर (Lid) काहीतरी लिहून हा जादूटोणा करण्यात आला होता. प्रत्येक वस्तूवर शेंदूर टाकण्यात आले होते. भोपळ्यासोबत लिंबांमध्येही खिळे ठोकण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कार्यालयाजवळ अनेक सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच सुरक्षा रक्षकांच्या (Security Guards) देखरेखीखाली हा जादूटोणा करण्यात आला, परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जादूटोणा करणारी व्यक्ती दिसली नाही आणि सुरक्षा रक्षकांनाही कोणीही दिसले नाही. (Black Magic)
कर्मचाऱ्यांवर संशय
हा भयानक जादूटोणा पाहून कर्नाटक मिल्क फेडरेशनचे कर्मचारीही हादरले. कर्नाटक मिल्क फेडरेशन तोट्यात चालत आहे. त्यामुळे खर्चात कपात (Cost Cutting) करण्यासाठी KMF ने 50 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासाठी शॉर्टलिस्ट केले आहे. त्यामुळे KMF चे संचालक (Director) प्रभु शंकर (Prabhu Shankar) यांनी कर्मचाऱ्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा आरोप (Allegation) केला आहे. बेल्लारीमधील KMF मध्ये चार जिल्ह्यांशी संबंधित कर्मचारी काम करतात. याशिवाय, राजकीय फायद्यासाठी (Political Gain) जादूटोणा केल्याचा आरोपही केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Black Magic)
Title : Black Magic Performed in Front of KMF Office in Bellary