Balck Rose India - #MeToo | सेलेब्रेटीच नव्हे सर्वसामान्य स्त्रियाही होतायत व्यक्त, मराठीत Black Rose चळवळ
- पुणे, महाराष्ट्र

#MeToo | सेलेब्रेटीच नव्हे सर्वसामान्य स्त्रियाही होतायत व्यक्त, मराठीत Black Rose चळवळ

पुणे | #MeToo मोहिम जगभरात चांगलीच चर्चेत असून सेलेब्रेटी तसेच पत्रकार महिलांच्या आरोपांमुळे भारतातसुद्धा खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा ही चळवळ जोर धरताना दिसत आहे. 

फक्त सेलेब्रेटीच नव्हे सर्वसामान्य स्त्रियाही आता आपली आपबीती सांगत आहेत. मराठीत Black Rose नावाने अशीच एक चळवळ सुरु झाली आहे. स्त्री, पुरूष, एलजीबीटी परिवारातील माणसं असं कुणीही या पेजवर लिहू शकतं.

मराठीतील काही तरुणींनी पुढाकार घेत Black Rose India नावाने फेसबुक पेज बनवलं आहे. ज्यांना आपले अनुभव सांगायाचे असतील ते या पेजला थेट संपर्क ( writetoblackroseindia@gmail.com ) करु शकतात.

दरम्यान, अनुभव कथनकर्त्यांना आपलं नाव द्यायचं नसेल तर ते न सांगण्याची काळजी देखील घेतली जाते. आता या पेजवर धक्कादायक अनुभव अपलोड होत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला

-#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे!

-विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको!”

-कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही- मुख्यमंत्री

-राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा