Top News देश

काळ्या गव्हाच्या उत्पादनामुळे ‘या’ शेतकऱ्याचं नशिब बदललं; आता कमावतोय लाखो रुपये!

एक छोटासा प्रयत्न शेतीतही भरभराट देऊन जातो, हा विश्वास विनोदच्या कामाकडं पाहून येईल. परंपरागत शेतात लावलं जाणारं पीक सोडून विनोदनं आपल्या शेतात हटके प्रयोग करण्याचं ठरवलं. पौष्टिक आणि प्रचंड मागणी असणार्या या पीकाच्या उत्पन्नातून विनोदला चक्क चौपट नफा झालाय. नक्की कोणत्या पीकाच्या उत्पन्नातून हे घवघवीत यशं विनोदला मिळवता आलं? जाणून घेऊया…

मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील सिरसौदा हे छोटसं गाव. या गावातील विनोद चौहान नावाचा तरूण शेतकरी आपल्या शेतातल्या एका प्रयोगामुळं चांगलाच चर्चेत आलाय. आपल्या शेतात लावल्या जाणार्या गव्हाऐवजी यावर्षी काळा गहू लावण्याचा विनोदनं निर्णय घेतला. गव्हाची काढणी झाली अन विनोदच्या आनंदाला पाराच उरला नाही. विनोदच्या रानातला हा काळा गहू घेण्यासाठी चक्क १२ राज्यांतून प्रतिसाद मिळाला आहे.

विनोदनं आपल्या रानातील १४ एकर क्षेत्रात काळा गहू लावण्याचा निर्णय घेतला. या पीकातून तब्बल २०० क्विंटल गव्हाचं भरघोस उत्पन्न त्याला मिळवता आलं. यानुसार दरवर्षी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा त्याचा चौपट नफा झाला होता. सिरसौदा परिसरात विनोदच्या या आधुनिक प्रयोगाचं चांगलच कौतुक होतं आहे.

काळा गहू हा आरोग्यासाठी फारच उत्तम समजला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर काळ्या गव्हाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. एवढंच नव्हे तर, या गव्हात शरिरासाठी आवश्यक लोहाचं प्रमाण सर्वाधिक असत. या कारणाने काळ्या गव्हाचा देशभरातून भरपूर मागणी असते.

विनोदच्या मते, १४ एकर क्षेत्रात काळा गहू लावताना २५ हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. मात्र यातून मिळत असलेल्या नफ्याचा विचार करता ही रिस्क महत्वाची ठरते. कॅन्सर, मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा वजन वाढलं असल्यास हा गहू अत्यंत गुणकारी ठरतो.

किंमतीचा विचार करायचा झाल्यास बाजारात काळा गहू ७ ते ८ हजार क्विंटल दरात विकला जातो. तुलनेने साधा गव्हाला फक्त २ हजार मिळतात. जर कमी जागेत जास्त उत्पन्न घ्यायचा विचार असेल तर काळ्या गव्हाची पेरणी करणं उत्तम पर्याय ठरू शकतो. असं विनोद सांगतो.

कृषी उपसंचालक जामले यांच्या मते, काळ्या गव्हाची पेरणी करण्याचा निर्णय याभागात काही शेतकरी घेतात. या गव्हाचा मधुमेहाचा त्रास असलेल्या रूग्णांना बराच फायदा झाल्याचं शेतकरी सांगतात. एवढंच नाही तर हा गहू पचनासाठी ही चांगला असतो. विशेष बाब म्हणजे या काळ्या गव्हाची चव अगदी नेहमीच्या गव्हासारखी असते.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

सुशांतच्या जाण्याने मला धक्का बसलाय; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

महत्वाच्या बातम्या-

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

सुशांतच्या आत्महत्येनंतर धनंजय मुंडेंची कोरोना वॉर्डातून भावनिक फेसबुक पोस्ट

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनं अक्षय कुमारला धक्का; म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या