बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

नवी दिल्ली | सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग (Tecnology Age) आहे. प्रत्येक गोष्टीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव असल्यानं आपल्या दैनंदिन जिवनात तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं झालं आहे. जगात औद्योगिक क्रांती (The industrial Revolution)  झाली आणि आपल्या हातात मोबाईल आला. सध्यातरी मोबाईल पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये (Mobile Provider Company) जोरदार स्पर्धा लागली आहे. अशातच मोबाईल निर्मीतीत मोठी चुक होत आहे ज्या कारणानं मोबाईलच्या स्फोटांमध्ये (Mobiles Blast) सातत्यानं वाढ होत आहे.

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मोबाईल कंपनी वन प्लस (One Plus) च्या एका मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना ताजी आहे. अशातच आता भारतीय नागरिकांमध्ये ज्या कंपनीची अधिक क्रेझ पाहायला मिळते त्या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पोक्को एम3 (Poco M3) या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला आहे.

27 नोव्हेंबर रोजी महेश नावाच्या वापरकर्त्यांनं याबाबत ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यांनतर लागलीच महेशनं हे ट्विट डिलीट केलं असलं तरी वेगानं त्यांचं ट्विट व्हायरल होत आहे. या फोनच्या स्फोटामध्ये ग्राहकाला कसलीही हानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर या घटनेवर पोको कंपनीकडून चौकशी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या भारतीय बाजार हा सर्वाधिक व्यवसाय होणारा स्मार्टफोन बाजार झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात स्मार्टफोन कंपन्यांमध्ये रस्सीखेच पहायला मिळतं आहे.

थोडक्यात बातम्या 

ॲमिटी विद्यापीठाचं मोठ पाऊल, अमेरिकेतल्या तीन विद्यापीठासोबत करार

‘माझ्यासोबत त्याला शारिरीक संबंध ठेवायचे होते…’; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

जंगलाच्या राजावर झेब्रा पडला भारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More