डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलयं तर अशाप्रकारे ब्लॉक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Block Debit and Credit Card l आजच्या काळात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक वेळा ही कार्डे हरवतात किंवा चोरीला जातात. अशा स्थितीत कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ते तात्काळ ब्लॉक करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू नये. मात्र कित्येक नागरिकांना ते कार्ड ब्लॉक कसे करायचे हे माहित नसते. त्यामुळे आज आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ऑनलाइन कार्ड कसे ब्लॉक करावे? :

– सर्वात प्रथम बँकेच्या ऑनलाइन बँकिंग पोर्टल किंवा मोबाइल ॲपला भेट द्या.
– त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील हा विभाग निवडा.
– यानंतर ब्लॉक पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ब्लॉक करण्याचे योग्य कारण द्या.
– योग्य कारण नमूद केल्यानंतर सबमिट करा, त्यानंतर बँक पुन्हा पडताळणी करेल.

– पुन्हा पडताळणीसाठी नोंदणीकृत फोनवर प्राप्त झालेला OTP तेथे प्रविष्ट करा.
– OTP टाकल्यानंतर तुम्हाला यशस्वी ब्लॉकचा SMS मिळेल.
– अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कार्ड ब्लॉक करू शकतात.

Block Debit and Credit Card l ऑफलाईन पद्धतीने करता येईल कार्ड ब्लॉक :

जर तुम्हाला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऑफलाइन ब्लॉक करायचे असेल तर तुम्हाला बँकेच्या जवळच्या शाखेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्ही बँक अधिकाऱ्याला भेट द्या. त्यानंतर ते तुम्हाला कार्ड ब्लॉक करण्यात मदत करतील.

तुम्ही एसएमएसद्वारेही कार्ड ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेने दिलेल्या नंबरवर फॉरमॅटसह मेसेज पाठवावा लागेल. मेसेज शेअर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. यानंतर तुमचे एसएमएसद्वारे कार्ड ब्लॉक केले जाईल. तसेच बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील तुम्ही कार्ड सहज ब्लॉक करू शकता. यामध्ये तुम्हाला कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करण्यासाठी थेट ग्राहक एक्झिक्युटिव्हशी बोलावे लागेल.

News Title : Block Debit and Credit Card Process

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

पुढील काही दिवसात सोन्याच्या किंमतीत होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या आजचे दर

बदलापूर आंदोलनप्रकरणी चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप!

युवराज सिंगच आयुष्य उलगडणार मोठ्या पडद्यावर; कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका?

राज्यात पुन्हा पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी