Top News आरोग्य कोरोना फोटो फिचर

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे सारं जग हतबल झाल्याचं चित्र आहे. जागतिक महामारी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या आजारावर मात करणं अजूनही मानवाला जमलेलं नाही. रोज नवनवीन शोध आणि रिसर्च यासंदर्भात चालू आहेत. कधीतरी यासंदर्भात ठोस लस सापडेल असा विश्वास समस्त मानवजातीला आहे आणि त्यामुळे यासंदर्भात जगभरात जोरदार रिसर्च चालू आहे. अशाच एका रिसर्चमध्ये कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. ही माहिती रक्तगटाशी संबंधित आहे.

A रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनापासून अधिक धोका असल्याचा दावा चीनच्या संशोधकांनी केला होता. कोरोना होणाऱ्या रुग्णांमध्ये A रक्तगटाच्या लोकांचं प्रमाण अधिक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आता जर्मनीच्या संशोधकांनी देखील या दाव्याला दुजोरा दिला आहे. कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जर्मनीच्या कील विद्यापीठात यासंदर्भात संशोधन करण्यात आलं आहे. विशिष्ट प्रकारचे जीन्स यासाठी जबाबदार असण्याची शक्यता आहे. A रक्तगटाचे लोक कोरोनामुळे गंभीर प्रकारे आजारी पडण्याचं प्रमाण ५० टक्के अधिक आहे आणि ते इतके आजारी पडू शकतात की त्यांना ऑक्सिजन सपोर्ट किंवा थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागू शकतं, असं या संशोधनात म्हटलं आहे.

कोरोनाचा तंदुरुस्थ तरुणांना कुठलाही धोका नसल्याचं सांगितलं जातं, मात्र अमेरिका-स्पेनसह काही देशांमध्ये सुदृढ आणि उत्तम स्वाथ्य असलेल्या तरुणांचा देखील कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. डेली मेलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानूसार A रक्तगट फॅक्टरमुळेच हे तरुण कोरोनाला बळी पडत असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

A रक्तगटाच्या लोकांना असलेला कोरोनाचा धोका अभ्यासण्यासाठी कील विद्यापीठानं या रक्तगटाच्या लोकांचा विशेष अभ्यास केला. यामध्ये इटली आणि स्पेनमधील १६१० रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये या रुग्णांच्या जीन्सची सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्यानंतर यामध्ये खास पॅटर्न मिळतो हा हे तपासण्यात आलं, त्यानंतर याची तुलना इतर २२०५ रुग्णांच्या अशाच माहितीसोबत करण्यात आली, की जे कोरोनामुळे गंभीर आजारी नव्हते.

संशोधनादरम्यान, लक्षवेधी असे दोन जीन्स एरिया आढळून आले. त्यातील एक जीन्स एरिया असा होता जो लोकांच्या रक्तप्रकारावर अवलंबून होता, तर A रक्तगटाच्या लोकांना कोरोनापासून अधिक धोका असल्याचं दिसून आलं.

दुसरीकडे O रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा तुलनात्मकरित्या कमी धोका असल्याचं देखील, या संशोधनात दिसून आलं आहे.

ट्रेंडिंग पोस्ट-

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी सातत्याने करा; आरोग्य मंत्रालयाची नागरिकांना सूचना

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या