डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
मुंबई | अनेकदा डोळ्यात कचरा गेला किंवा काही इन्फेक्शन झालं तर आपला डोळा खाजतो आणि लाल होतो. मात्र, डोळ्याचा पांढरा भाग सतत लाल होत असेल आणि ती स्थिती अनेक दिवस कायम राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
डोळ्याचा पांढरा भाग सतत लाल राहात असेल तर ती समस्या बल्ड शॉट्स आईजची असू शकते. डोळ्याच्या पांढऱ्या भागातील बारीक रक्तवाहिन्या पसरतात आणि सुजतात त्यामुळे हा आजार होऊ शकतो.
एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहणारा लालसरपणा, अंधक दृष्टी, दोन्ही डोळ्यात तीव्र वेदना, प्रकाश सहन न होणं ही या गंभीर आजाराची लक्षणं आहेत. अॅलर्जी, प्रदुषण, कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ वापर, काचबिंदू, डोळ्यांना दुखापत यासारख्या अनेक गोष्टी या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात.
दरम्यान, ही लक्षणं आढळून आली तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वरील दिलेली माहिती वैद्यकीय माहितीवर अवलंबून आहे. मात्र, कोणत्याही निष्कर्षापूर्वी आणि उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका
सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये
येत्या काही तासात ‘या’ भागात पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”
“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”
Comments are closed.