मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण
नवी दिल्ली | मासिक पाळी दरम्यान महिलांना प्रचंड पोटात दुखणं, अंग दुखणं, पाठ दुखणं असा त्रास होतो. मात्र चंदिगडमधील एका 25 वर्षीय तरुणीच्या मासिक पाळी दरम्यान डोळ्यातून रक्त आल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे.
या तरुणीला मागच्या महिन्यात देखील पाळीच्या दरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव होत होता. या कारणामुळे तिने डाॅक्टरांकडे दाखवलं. तिचा त्रास पाहून डाॅक्टरांनी तिला अनेक नेचिकित्सा आणि रेडिओलाॅजिकल टेस्ट करायला सांगिल्या. मात्र सगळ्या टेस्टचे रिपोर्टस नॉर्मल आल्यामुळे डाॅक्टरांनी तिची अधिक तपासणी केली. त्यादरम्यान तिला जुना कुठलाही आजार नसल्याचं समोर आल्याने डाॅक्टरांना देखील धक्का बसला.
डाॅक्टरांनी पुढील तपास केल्यानंतर या तरुणीला मासिक पाळीसंबंधी ‘ocular vicarious menstruation’ हा आजार असल्याचं समोर आलं. या अवस्थेमध्ये बाह्य अवयवांमधून मासिक पाळीच्या काळात चक्रीय रक्तस्त्राव होतो. डाॅक्टरांनी या तरुणीला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या ज्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेराॅन यांचं मिश्रण आहे. तीन महिन्यांनंतर त्या तरुणीचा ररक्तस्त्राव बंद झाला.
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम रक्तस्त्राव होण्याच्या परिणामी या अवयवांमधील रक्तवहिन्यासंबंधात होतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका
“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”
‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप
डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.