बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तृतीयपंथियांमध्ये खुनी खेळ, 55 लाखांची सुपारी देऊन दुसऱ्या गँगच्या म्होरक्याला मारलं!

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2020 रोजी दिल्लीतील जीटीबी एन्क्लेव येथे राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची हत्त्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. या तृतीयपंथीयाला गोळ्या घालून संपवण्यात आलं. या प्रकरणातील आरोपींवर दिल्ली पोलिसांनी ईनाम ठेवलं असून पहिल्या आरोपीवर 1 लाख तर दुसऱ्या आरोपीवर 50 हजार रुपयांचं ईनाम ठेवण्यात आलं होतं.

या घटनेमधील मृत तृतीयपंथीयाचं नाव एकता जोशी असं आहे. या तृतीयपंथीयाची 5 सप्टेंबर 2020ला 6 गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या खुलास्यानूसार या तृतियपंथीयाची हत्या करण्यासाठी त्यांना 55 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. एकता जोशी आणि तिची सावत्र आई या दोघींच्या हत्यासाठी ही सुपारी देण्यात आली होती.

या घटनेतील मुख्य दोन आरोपींपैकी एकाचं नाव गगन पंडीत असून दुसऱ्याचं नाव वरुण पंडीत असं आहे. दिल्लीतील फरिदाबादमध्ये एक तृतीयपंथीयांची टीम आहे. या टीमचं नेतृत्त्व सोनम आणि वर्षा करतात. तसेच जीटीबी एन्क्लेवमध्ये कमला दुसरी टीम लीड करते. या दोन्ही टीमचे एकता जोशी सोबत परिसरातील पैसे वसूल करण्याच्या वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. यातूनच त्यांनी एकता जोशीला संपवण्याची सुपारी दिली होती.

दरम्यान, या हत्येसाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात आला होता असं आरोपी गगनने सांगितलं आहे. एवढंच नाही तर हा प्लॅन पूर्ण करण्यासाठी एकूण 7 आरोपींनी यामध्ये सहभाग घेतला होता. या सर्व सात जणांना पोलिसांनी अटक केली असून गगनवर हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच लूटमार अशा अनेक गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

राज्यात कोणत्याही क्षणी लागू शकतो लॉकडाऊन; ‘या’ 6 गोष्टींची काळजी घ्या!

रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरु; ‘या’ क्रमांकावर संपर्क करुन मिळवा इंजेक्शन

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More