Top News

‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन

मुंबई | मुंबई महापालिकेने दिवाळीनिमित्त फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून भावा-बहिणींनाही भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.

सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नका, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.

यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाज्यात ठेवण्यास सांगण्यात आलं असून हातपाय, चेहरा धुऊनच घरात प्रवेश करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा; शिवसेनेचा भाजपाला टोला

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”

…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या