बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापालिकेला सफाई कामगार हवेत की आयएएस अधिकारी???

मुंबई | गायनेशियम म्हणजे काय? भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण? लोणच्यात असणाऱ्या विनेगरमध्ये काय वापरलं जातं? सगळ्यात विस्तृत नक्षत्र कोणते? असे अजब प्रश्न चक्क सफाई कामगार भरतीसाठी विचारण्यात आलेत.

मुंबई महापालिकेने नुकतीच सफाई कामगारांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली होती. दहावी उत्तीर्णासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. 

सर्वसामान्य आणि मागास उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी असे अवघड प्रश्न विचारले का?, असा सवाल आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत विचारला.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याप्रकरणी सरकारला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More