Top News

लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई | दिवाळी तोंडावर आली असून प्रदूषणामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. यावर मुंबई महापालिकेने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने केवळ एक दिवस सोडून फटाक्यांवर बंदी घातलीये.

मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी देण्यात आलीये.

सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला मुंबई महापालिकेकडून बंदी घालण्यात आलीये. यासंदर्भात मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केलीये.

फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराने कोरोनाग्रस्त रुग्णांना त्रास होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आलीये. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कारवाई केली जाणारे.

महत्वाच्या बातम्या-

पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”

अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या