मुंबई | मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये एकूण २५२ शिक्षकांची निवड करण्यात आली होती, मात्र आता मराठीत शिक्षण झाल्याचं कारण देत या शिक्षकांना नियुक्ती नाकारण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात पीडित शिक्षक येत्या १८ फेब्रुवारीला शिवाजी पार्कपासून शिवसेना भवनावर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सिद्धार्थ इंगळे हे या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगणार आहोत, बघा तुमच्या सत्तेत मराठी माणसासोबत काय होत आहे, असं इंगळे म्हणाले.
शिवसेनेची स्थापना मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी दक्षिण भारतीयांविरोधात एल्गार पुकारला होता. ‘उठाव लुंगी, बचाव पुंगी’ अशी घोषणा त्यांनी दिली होती. आता तीच शिवसेना राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असताना मराठी येत नसल्याचं कारण देत शिक्षकांना नियुक्ती नाकारण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
खासगी शाळेत शिक्षका म्हणून काम करणाऱ्या जागृती पाटील यांची मागच्या वर्षी बीएमसीच्या शाळेत शिक्षकपदी निवड झाली होती. तिथं काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी खासगी शाळेचा राजीनामा दिला होता, मात्र तुमचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, इंग्रजी माध्यमातून नव्हे त्यामुळे आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेत चांगले गुण घेऊन आम्ही मेरिटमध्ये आलो, ज्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय मात्र आमच्यापेक्षा कमी गुण आहेत, अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं गेलं, असंही त्या म्हणाल्या. न्यायाची मागणी करत त्या तब्बल एक वर्षापासून वणवण भटकत आहेत.
अमित पाटील यांच्यासोबतही तेच घडलंय. महाराष्ट्राची कुठलीही परीक्षा पास करणं सोपं नाही. आम्ही ती चांगल्या गुणांनी पास केली, त्यानंतरही बीएमसीचे अधिकारी म्हणतात, आम्ही नोकरी देऊ शकत नाही. एक तर सरकार १० वर्षातून एकदा सरकारी नोकरी काढतं, त्यात हे असं म्हटल्यावर आम्ही जाणार तरी कुठे?, असा सवाल त्यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येताच सर्वात मोठी घोषणा
येतेय मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा… सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत
विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्याला ईडीनं केली अटक
बेफिकिरी नडणार! डिसेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत एवढी वाढ
भारतासह ‘या’ दोन देशांमध्येही भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा