मुंबई | भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महानगरपालिकेने (BMC) आणखी एक झटका दिला आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील आठ मजली ‘अधिश’ बंगल्याप्रकरणी महापालिकेने राणेंचा अर्ज फेटाळून लावला आहे.
मुंबई महापालिकेने नारायण राणेंना त्यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यामधील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस धाडली होती. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने अधिश बंगल्याची तपासणी केली. यावेळी बंगल्यात अनाधिकृत बांधकाम असल्याचं महापालिकेच्या लक्षात आलं होतं.
हे अनाधिकृत बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठी नारायण राणेंनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, महापालिकेने हा अर्ज फेटाळून लावत नारायण राणेंना जोरदार झटका दिला आहे. हा अर्ज फेटाळताना महापालिकेने 15 कारणं देत हे बांधकाम नियमीत करणे शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, महापालिकेकडून नारायण राणेंना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 दिवसांच्या आत जर राणेंनी स्वत:हून हे अनाधिकृत बांधकाम नाही पाडलं तर महापालिका हे बांधकाम पाडेल व त्याचा खर्च वसूल करेल, असं महापालिकेने नोटीस पाठवत स्पष्ट केलं आहे. महापालिकेचं हे पाऊल नारायण राणेंसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“…अशा पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”
“गिरीश महाजनांनी मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही”
“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजून सांगावं, नाहीतर…”
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
“हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही…”
Comments are closed.