मुंबई | देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक वेगात होत आहे. मुंबईत वाढता कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिकेने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबई महापालिकाने दक्षिण कोरियाकडून 1 लाख किट्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईत रॅपिड टेस्टिंग सुरु होणार आहे.
रॅपिड टेस्टमुळे इन्फेक्शन झालं आहे का याची माहिती मिळते. इन्फेक्शन झाले असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.
दरम्यान, मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या लॉकडाऊन असताना देखील प्रचंड मोठ्या संख्येने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत आता संचारबंदीची मागणी होऊ लागली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट
राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या
मनसे जितेंद्र आव्हाडांच्या पाठिशी
हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू
मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?
Comments are closed.