मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंनी राज्यभरातील मॉल्स, दुकाने, व्यायामशाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र राज्य सरकारने दिलेले आदेश धुडकावून वांद्र्यातील ही जिम फक्त अभिनेता शाहिद कपूरसाठी उघडी ठेवली असल्याचं समजत आहे. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समजत आहे.
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतसाठी जिम उघडी ठेवण्यात आली. या जिममध्ये शाहिद आणि मीरा यांना वर्कआऊट करताना पाहिलं गेलं. शाहिद कपूर आणि जिमचे मालक युधिष्ठिर जयसिंग यांच्या या बेजबाबदार वागणुकीबद्दल महापालिकेने त्यांना फटकारलं.
एका व्यक्तीसाठीसुद्धा जिम उघडणं चुकीचं आहे. जर राज्य सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन होत नसेल तर संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल आणि त्यांचे लायसन्ससुद्धा रद्द करण्यात येतील, असं एच-पश्चिम वॉर्डचे पालिका सहआयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितलं.
दरम्यान, शुक्रवारपासून हा जिम बंद आहे. तिथे कोणीही वर्कआऊट करत नाही आणि प्रशिक्षकसुद्धा हजर नाहीत. आम्ही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत, असं जिम मालकानं सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘हा’ तर निव्वळ बेजबाबदारपणा’; कोरोनाग्रस्त रुग्णावर रितेश संतापला
‘येस बँक’ निर्बंधमुक्त; 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘तो’ व्यवसायही बंद!
सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!
Comments are closed.