बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

मुंबई | बॉडी बिल्डिंगमधले सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडी बिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं आहे. जगदीश हे केवळ 34 वर्षांचे होते. बडोद्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीश लाड याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जगदीश हे नवी मुंबईत वास्तव्यात होते. गेल्यावर्षीच त्यांनी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असतानाच शारीरिक स्थिती गंभीर झाल्याचं त्यांचा मृत्यू झाला.

अनेक तरूणांसाठी जगदीश हा प्रेरणास्थान होता. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकं मिळवली होती. इतकंच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर जगदीशने नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं.

जगदीश यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. तसेच जगदीश लाड यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

धक्कादायक! कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून अत्यंत क्रूरपणे तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More