बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एक सुसाईड नोट लिहित त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. सध्या मनोजला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल बुधवारी रात्री मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

बुधवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करत मनोज पाटीलनं अभिनेता साहिल खानवर छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मनोजनं लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल करत तो सतत माझं करिअर संपवण्याची धमकी मला देत आहे, असं मनोजनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियावर बदनामी करतो त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं मनोजनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याचे हे सुसाईड नोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, गोळ्या खात मनोजनं रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजताच रात्री उशिरा त्याच्या कुटुंबियांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याशिवाय त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

थोडक्यात बातम्या –  

बॉसनं पगार न दिल्यामुळे पठ्ठ्यानं उचललं धक्कादायक पाऊल…, पाहा व्हिडीओ

‘लहान मुलं कोरोनामुक्त झाले तरी…’; संशोधनातून चिंतेची बाब समोर

केंद्र सरकारची पशुपालकांसाठी मोठी घोषणा, ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी

वानवडी बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More