बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव हिच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. झिम्मा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सायलीच्या बोल्डसीनमुळे प्रेक्षक त्याकडे आकर्षित झाले आहेत.

सायली संजीव हिचा आंघोळ करतानाचा एक बोल्डसीन झिम्मा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. त्याचीच चर्चा समाज माध्यमावर सध्या सुरू आहे. तसेच हा ट्रेलर तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सायलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटाचा ट्रेलर जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर तो ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच सायलीच्या बोल्डसीननं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून नावारूपाला आलेली सायली संजीव ही अभिनेत्री मराठी चित्रपट सृष्टीतही नावलौकिक प्राप्त करण्याच्या तयारीत आहे. तसेच तिने त्यादिशेनं काम करायलाही सुरू केलं आहे. सायली संजीवच्या चाहत्यांनी तिला झिम्मा या चित्रपटासाठी शुभेच्छा ही दिल्या असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

पाहा व्हिडिओ –

 

थोडक्यात बातम्या – 

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याची आत्महत्या

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More