बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. काही वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला. सुशांत सोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता मानसिक नैराश्येत गेली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने अंकिताला जबरदस्त धक्का बसला.

अंकिता लोखंडेला सुशांत सिंहच्या आत्महत्येची माहिती एका फोनद्वारे मिळाली. ज्या क्षणी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे समजले, तेव्हा ती जोरात फक्त ‘काय’ म्हणून ओरडली आणि दुसऱ्या क्षणात तिने फोन ठेवला.

सुशांत सिंह आणि अंकिता लोखंडे या दोघांनी छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले. या दरम्यान ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबूली दिली. रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा ब्रेकअप झाला.

ब्रेकअपनंतर सुशांतने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले. मात्र अंकिता लोखंडेला या ब्रेकअपचा जबर झटका बसला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

सुशांतच्या जाण्याने मला धक्का बसलाय; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येनंतर धनंजय मुंडेंची कोरोना वॉर्डातून भावनिक फेसबुक पोस्ट

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनं अक्षय कुमारला धक्का; म्हणाला…

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More