Top News आरोग्य कोरोना मनोरंजन

आमिर खानच्या घरी कोरोनाचा शिरकाव, स्टाफ सदस्य निघाले पॉझिटीव्ह

मुंबई | काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहर तसंच बॉनी कपूर यांच्या घरातील स्टाफमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अभिनेता आमिर खानच्या घरातील स्टाफना देखील कोरोना झाल्या असल्याचं खुद्द आमिरने सांगितलं आहे. याबाबत आमिरने एक पत्र शेअर केलं आहे.

आमिरने या पत्रामध्ये लिहितो की, माझ्या स्टाफमधील काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलंय. त्यांना तातडीने विलग करण्यात आलंय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरवल्याने मी बीएमसीचे आभार मानतो. ते माझ्या स्टाफची चांगली काळजी घेतायत. यासह संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जातंय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

आमिर पुढे म्हणतो, “यानंतर आमच्या सर्वांचीही कोरोना टेस्ट झाली आणि आम्ही निगेटिव्ह ठरलो आहोत. मात्र माझ्या आईची कोरोना टेस्ट अजून बाकी आहे. आईची कोरोना चाचणी निगेटीव्ह यावी अशी प्रार्थना करा. बीएमसीने सर्वांची काळजी घेतली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानतो. ”

दरम्यान, आमिर खानने कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचार्‍यांचे आभार मानलेत. वैद्यकीय अधिकारी सर्व प्रक्रिया आणि काळजीपूर्वक सर्व चाचण्या करतायत. याचबरोबर आमिर खानने सर्वांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या