मनोरंजन

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

मुंबई |  अभिनेता आफताब शिवदासानी बाप बनला आहे. त्यांच्या घरात चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी दिली आहे.

आफताब आणि त्याची पत्नी निन दुसांज यांना मुलगी झाली आहे. फोटो पोस्ट करत त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. बाप बनल्याची फिलिंग त्याला खूप आनंद देऊन गेली आहे, हे पोस्टवरून अगदी सहज दिसून येत आहे.

स्वर्गाचा तुकडा पृथ्वीतलावर पाठवण्यात आलाय… देवाने दिलेल्या आशीर्वादासह. मला आणि माझ्या पत्नीला सांगताना खूप आनंद होतोयृ, की आमच्या मुलीचा जन्म झालाय. आम्ही प्राऊड पेरेंट्स आहोत आणि आमचं कुटुंब तिघांचं झालं आहे, अशी इंन्स्टाग्राम पोस्ट त्याने लिहिली आहे.

 

 

आफताबने जी इंन्स्टाग्राम पोस्ट केली आहे तसंच जो फोटो पोस्ट केला आहे त्यामध्ये बाळाचा फोटो दिसत नाहीये. मात्र त्याने आणि त्याच्या पत्नीने आपल्या हातांनी हार्ट शेप तयार करून त्यामध्ये बाळाची पावले दाखवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे विभागीय आयुक्तपदी सौरव राव यांची नियुक्ती

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या