मनोरंजन

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये उपचार सुरु

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आज  सकाळी त्याची तब्येत अचनाक बिघडली आहे.

इरफानला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला आहे. त्यावरच त्याचे उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा तयार होत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

दरम्यान, 2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

‘मोदीजी आता अधिकच्या नोटा छापा’; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट; अभिव्यक्तीची गळपेची होतीये म्हणत सरकारवर सडकून टीका

कोरोना इतक्या लवकर जाणार नाही, आम्हाला लहान मुलांची काळजी- जागतिक आरोग्य संघटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या