बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलदार भाईजान… कोल्हापुरमधील हे पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

मुंबई |  बॉलिवूडचा ‘भाईजान’ असलेल्या सलमान खानने महाराष्ट्रात झालेल्या अतवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका बसलेल्या एका गावासाठी दिलदार झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. अद्याप सलमान खानकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरं पुन्हा बांधून देण्यासाठी ‘भाईजान’ने उशिरा का होईना, धाव घेतली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून राहिलं- फडणवीस

दोन हजारच्या नोटा बंद करणार का?; निर्मला सीतारामन याचा मोठा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांच्या काळातील बळीराजा चेतना अभियानात 6 कोटी 25 लाखांचा घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप

भास्कर जाधवांची नाराजी कायम; सभागृहात शिवसेनाविरोधात आवाज

“मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल पण कारट्यानं नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More