मुंबई। सहसा कोणतीही अभिनेत्री करियरला ब्रेक लागू नये म्हणून लग्नानंतर बरेच वर्ष प्रेग्नन्सीचा विचार करत नाही. मात्र आलियानं असं केलं नाही. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच तिनं चाहत्यांना तिच्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिली हे ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात.
त्यानंतर तिच्या चाहत्यांना असा प्रश्न पडला की, लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय? अलीकडे आलिया भट्टने कारण जोहरचा कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली. तिची मुलाखत घेत असताना ती म्हणाली की, जेव्हा मी कारण जोहरला माझ्या लग्नाची बातमी सांगायला गेले त्यावेळेस कारण त्याच्या ऑफिसमध्ये होता आणि तेव्हा त्याचा ‘बॅड हेअर डे’ होता. त्याचे केस सेट होत नव्हते आणि तो वैतागलेल्या अवस्थेत डोक्याला हेअर कॅप लावून बसला होता, मी त्याला माझ्या लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा ते ऐकून तो अक्षरशः रडत होता.”
काही दिवसांपूर्वी आलियानं तिच्या लग्नाबाबत सांगितलेला किस्सा कारण जोहरच्या एका मुलाखतीशी फार मिळता जुळता होता. आलियाने प्रेग्नन्सीची बातमी दिल्यानंतर कारणची एक मुलाखत झाली, ज्यामध्ये तो म्हणाला की, जेव्हा आलियाने मला तिच्या लग्नाची बातमी सांगितली त्यावेळेस, माझा बॅड हेअर डे होता. ती माझ्या ऑफिसमध्ये अली त्यावेळेस मी कॅप लावून, हूडी घालून बसलो होतो.
तिने मला तिच्या प्रेग्नन्सीविषयी सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलीला मी माझं बाळं मानतो, तिचं बाळं या जगात येणार असल्याची वेगळाच आनंद होता.” करणच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ आलियाच्या लग्नाच्या किस्स्याशी जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”
अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख, म्हणाला…
खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी एकमेकींना धुतलं, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
शिंदे गटाच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
Comments are closed.