बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गिधाडांनो त्या कार्तिकला एकटं सोडा; आता त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शन्सच्या बहुचर्चित ‘दोस्ताना-2’ मधून वगळण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर काल ट्विटरवर कार्तिक आर्यनच्या बाजूने लाखो ट्विट करण्यात आले. त्यानंतर बाॅलिबूड अभिनेत्री कंगणा राणौतने ट्विट करत दिग्दर्शक करण जोहरवर कडक शब्दात हल्ला चढवला आहे.

कार्तिक स्वत:च्या हिंमतीवर इथंपर्यंत पोहचला आहे आणि पुढेही तो अजून स्वत:च्या हिंमतीवर काम करत राहील. करण जोहर आणि त्यांची नेपोटिझम गँगना एवढेच सांगते की, त्याला तरी आता एकटे सोडा. सुशांतच्या जसे मागे लागला होतात, तसे त्याच्या मागे पडू नका आणि त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका. गिधाडांनो त्याला एकटे सोडा, असं ट्वीट कंगणाने केलं आहे.

कार्तिकने या चिल्लरांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. घाणेरडे लेख लिहून आणि घोषणा देवून केवळ मनोबल खच्चीकरण करण्याचे काम चाललं असून त्याबाबत मौन पाळायचं नाटक यांनी लावलंय. या लोकांनी यापूर्वी सुशांतसाठी तो अमली पदार्थांमध्ये कसा गुरफटला आहे आणि त्याच्या व्यसनाधीनतेची कथा रचली होती, असा आरोप देखील कंगणाने केला आहे.

दरम्यान, तुझ्या सोबत आम्ही नेहमी आहोत हे लक्षात ठेव. ज्यांनी तुला बनवलं नाही, ते तुला बरबादही करू शकत नाहीत, आज तुला फारच एकटेपणा जाणवत असेल, त्रास होत असेल. मात्र असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही, असं कंगणा म्हणाली.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“मोदींच्या जागी आणखी कोणी असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

रेमडेसिवीर मिळत नसेल तर… खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘हे’ पर्यायी औषध!

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले कुंभमेळ्यातील सर्व संतांचे आभार!

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More