बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं, आता…

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना राणावतने (Bollywood Actress Kangana Ranaut)  काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर तिच्या या वक्तव्याविरोधात संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतरही कंगनाने पुन्हा एकदा शिख समुदायावर बेताल वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून शीख समुदायाने कंगणाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर 6 डिसेंबरला हजर राहण्याचा आदेश कंगनाला मिळाला आहे. दिल्ली विधानसभेच्या शातंता व सलोखा समितीसमोर कंगनाला हजर राहावं लागणार आहे. कंगनाने देशात कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला खलिस्तान तर शेतकऱ्यांना खलिस्तानी दहशतवादी असा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

कंगनाने शीखांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली होती. दिल्ली शीख गुरुद्वार व्यवस्थापन समिती आणि मुंबईतील काही व्यावसायिकांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. याआधीही कंगनावर अनेकदा तक्रारी देण्यात आल्या असून मुंबई पोलिसांनी यापूर्वी एकदा तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, कंगना सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. याआधी तिने देशाला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे केवळ भीक होती, असं वक्तव्य केलं होतं. तर मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर तिने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना रस्त्यावरचे लोक म्हणत देशाला जिहादी राष्ट्र म्हटलं होतं. मात्र, आता कंगनाला तिची वक्तव्य चागंलीच भोवण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More