बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही’; ‘या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कविता कौशिकने ‘एफआयआर’ या मालिकेमध्ये चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली आहे. तिच्या या अभिनयामुळे प्रक्षकांनी तिला अगदी डोक्यावर घेतलं. तिचा हटके अंदाज लोकांना खुप आवडला होता. तशीच ती सध्या खऱ्या आयुष्यातही बिनधास्तपणे वावरताना दिसतेय. त्याबरोबर सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत ती चर्चेत असते. अशातच एका वक्तव्यांमुळे सध्या कविता कौशिक पुन्हा चर्चेत आली आहे.

प्रत्येक स्त्रीला आई होणं हे तिच्यासाठी खुप मोठी गोष्ट असते. मात्र कविताने आई न होण्याची इच्छा एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. माझ्याकडे एक मांजर आणि कुत्रा आहे. तेच माझे कुटुंब आहेत, मला भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात माझ्या मुलाला आणण्याची इच्छा नाही आहे, असं कविताने म्हटलं आहे.

बिझनेसमन रोनित बिसवाशी यांच्यासोबत जानेवारी 2017 कविता कौशिकने लग्न केलं होतं. त्या दोघांनी लग्न अगदी साधेपणाने केलं होतं. तिला एका मुलाखतीमध्ये आई कधी होणार आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून कविताने आई होण्याच्या प्रश्नांवर मौन सोडलं आहे.

दरम्यान, ‘एफआयआर’ या मालिकेनंतर कविताने काही काळ मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर कविता ‘बिग बॉस 14’ या सलमान खानच्या शो मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मारत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र त्या घरात सतत वाद होत असल्यानं कविताने बिग बॉस 14 शो मधूूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या-

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

पक्षाकडून बंदी मात्र ‘राष्ट्रवादी युवक’कडून गर्दीच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु

“काँग्रेसच्या माडीला पवारांचा टेकू”; दानवेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More