बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल

मुंबई। बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या खास अंदाजामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. कधी कधी ती एखादं बेधडक वक्तव्या करते तर कधी एखादा व्हिडीओचं निमित्त ठरते.

अशातच राखी मात्र पुन्हा एकदा चर्चेत आली. राखीने मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूडची अभिनेत्री सुश्मिता सेन आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. आणि राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

नेहमी प्रमाणे राखी तिच्या जिमच्या बाहेर एका नवीन लूकमध्ये झळकली. यावेळी पापाराझींनी राखीला ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चांविषयी विचारलं. त्यावर राखी म्हणाली की, जेव्हा त्या दोघांविषयी मला असमजलं त्यावेळेस मला ते ऐकून धक्का बसला. मला थोडावेळ काही समजेनासं झालं. पण तरी देखील मी म्हणेल की, जेव्हा मला त्या दोघांची प्रेमकहाणी समजली त्यावेळेस मी खुश झाले. त्यांची प्रेमकहाणी अतिशय सुंदर आहे. नंतर ती असं देखील म्हणाली की, मोदीजी काही का करत नाहीत. इथे प्रत्येकजण गुन्हा करून देश सोडून जातो.

राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली. इतकच न्हवे तर तिला तिच्या नवीन हेअरस्टाईलवरुन वरुन ट्रोल केल्याचं दिसतंय तर काहींनी तिला नवी हेअरस्टाईल छान दिसत असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कॉफी विथ करण 7’ मध्ये जान्हवी कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली…

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; नवं गाणं लवकरच येणार

“…तर मी शरद पवारांच्या घरी जाऊन माफी मागून दिलगीरी व्यक्त करेन, ते माझ्या गुरुसमान”

10 वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच; पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी

“महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलो म्हणून जर आम्हाला गद्दार ठरवत असतील तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More