मनोरंजन

अभिनेत्री तापसी पन्नूला आलं ‘इतक्या’ हजारांचं वीज बिल; ट्विट करत व्यक्त केला संताप

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल 36 हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे.

लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?, असं तापसीने म्हटलंय.

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला 4390 तर मे महिन्यात 3850 रुपये बिल आलं होतं. तसेच यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

आपण फक्त स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा तिथे जात असल्याचं तापसीने म्हटलं आहे. तापसीने यावेळी वीज बिलावर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना कोणी माझ्या नकळत घराचा वापर करतंय का याची चिंता असल्याचं म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

महत्वाच्या बातम्या-

शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

…तरच मुंबई पुण्याची गर्दी कमी होईल, संजय राऊतांनी गडकरींना ठणकावलं

गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या