बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई |  अभिनेते आणि अभिनेत्री आता आपला फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहेत. यामध्ये जीन, डायट आणि योगा करत आहेत. अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती बॉक्सिंग करताना दिसत आहे. यासाठी तिने  आपला फिटनेसही चांगल्या पद्धतीने ठेवला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे  तिचा ट्रेनर तिला पोटावर पंच करत आहे. काही पंच होईपर्यत उर्वशी हललीसुद्धा नाही. त्यामुळे चाहतेही चकीत झाले आहेत. मात्र उर्वशी इतकी मेहनत का घेत आहे?, कोणत्या चित्रपटासाठी की खरंच बॉक्सिंग शिकत आहे. याचं उत्तरही तिने आपल्या कमेंटमध्ये दिलं आहे.

हे सगळ्या नव्या अॅक्शन चित्रपटसाठी चालू असल्याचं उर्वशी रौतेलाने सांगितलं आहे. मात्र नक्की कोणत्या चित्रपटासाठी ते तिने उघड केलं नाही. उर्वशी ही बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतःच्या लुकवर फार लक्ष देते. नेहमी तिचे जीम व्हिडीओ ती शेअर करत असते. तर आता ती बॉक्सिंगही शिकत आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्वशी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते.

 

थोडक्यात बातम्या- 

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

कोरोना लस घेतल्यावर बेशुद्ध झाला व्यक्ती अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More