Deepika Padukone l आयएमडीबीने गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, रणबीर कपूर, शाहरुख खान आणि ऐश्वर्या बच्चन यांना मागे सारत अभिनेत्री दीपिका पादुकोण अव्वल ठरली आहे.
दीपिका पदुकोणने पटकावलं अव्वल स्थान :
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये ओम शांती ओम या चित्रपटामध्ये दिग्गज स्टार शाहरुख खानसोबत सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने IMDb ने जाहीर केलेल्या यादीत बाजी मारली आहे. बॉलिवूडच्या किंग खानला मागे टाकत या अभिनेत्रीने अव्वल स्थान मिळवले आहे.
चित्रपट उद्योगातील तिच्या कारकिर्दीमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर्समध्ये भूमिका केली आहे व त्यामध्ये कॉकटेल, ये जवानी है दीवानी, आणि पद्मावत व इतर भूमिकांचा समावेश आहे. तिने 2017 मध्ये हॉलीवूडमध्ये xXx: रिटर्न ऑफ एक्सेंडर केजसह पदार्पण केले व त्यामध्ये तिने व्हीन डिझेलसोबत झळकली.
Deepika Padukone l सर्वाधिक बघितले गेलेले भारतीय कलाकार कोणते? :
यासंदर्भात बोलताना दीपिका म्हणाली की, ‘IMDb हे विश्वासाचे प्रतीक आहे, जे लोकांची आवड आंबी प्राधान्याला दर्शवते. हा सन्मान मला खऱ्या अर्थाने विश्वासार्हतेसह आणि प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम या लक्ष्याशी जोडत राहण्याची प्रेरणा देतो.
1. दीपिका पदुकोण
2. शाहरुख खान
3. ऐश्वर्या राय बच्चन
4. आलिया भट्ट
5. इरफान खान
6. आमिर खान
7. सुशांत सिंह राजपूत
8. सलमान खान
9. हृथिक रोशन
10. अक्षय कुमार
11. कतरीना कैफ
12. अमिताभ बच्चन
13. समंथा रूथ प्रभू
14. करीना कपूर
15. तृप्ती डीमरी
16. तमन्ना भाटिया
17. रणबीर कपूर
18. नयनतारा
19. रणवीर सिंह
20. अजय देवगण
News Title – Bollywood Celebrity IMDB Rating
महत्त्वाच्या बातम्या-
शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती
पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता
मोठी बातमी! अंदाधुंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ
पुढील काही दिवसांत ‘या’ राशीच्या व्यक्तींना राजकारणातून गोड बातमी मिळेल