बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी!

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतच्या या मृत्यूला बाॅलिवूडची गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कंगना राणावत, विवेक ओबराॅय सारख्या कलाकारांनीही याला दुजोरा दिला आहे.

बाॅलिवूडमध्ये चालणारं नेपोटीझम यामुळं पुन्हा चर्चेत आलंय. रणबीर, आलिया असे अनेक स्टार किड्स सेलिब्रिटी झाले, मात्र घरात फिल्मी बॅकग्राऊंड असतानाही काही कलाकार फ्लाॅपच राहिले. बाॅलिवूडच्या पडद्यावर फ्लाॅप ठरलेल्या अशाच काही स्टार किड्स बद्धल जाणून घेऊया…

१. उदय चोपडा

प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोपडांचा मुलगा म्हणून उदयला ओळखलं जातं. धूम व मोहब्बते या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. मात्र बाॅलिवूडचा अभिनेता म्हणून तो फ्लाॅपच ठरला. यश चोपडा यांचे अनेक चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलेच सुपरहिट ठरले. मात्र वडिलांसारखं यश मुलाला मात्र काही केल्या मिळवता आलं नाही.

२. हरमन बावेजा

हरमन बावेजा हे नाव कुणाच्या ऐकिवात असेल का, याविषयी थोडी शंकाच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हैरी बावेजा यांचा हा मुलगा. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘लवस्टोरी’ या चित्रपटातून त्यानं पदार्पण केलं. मात्र हा पहिलाच चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. हरमनला कारकिर्दीत ६ चित्रपट मिळाले. प्रियंका चोपडा सारख्या अभिनेत्री सोबत काम करूनही त्याला अभिनयात जम बसवताच आला नाही.

३. अध्ययन सुमन

बाॅलिवूडमधला नावाजलेलं नाव म्हणजे शेखर सुमन. अभिनेता,गीतकार, दिग्दर्शक, निर्माता या विविध क्षेत्रात वावर असलेला हा अवलिया यशाच्या शिखरावर पोहचला. मात्र शेखरचा मुलगा अध्ययन सुमन मात्र बाॅलिवूडमध्ये फ्लाॅपच ठरला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या हाल ए दिल चित्रपटातून त्यानं बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला. अनेक चित्रपटात काम करूनही मात्र त्याचं करियर फ्लाॅपच ठरलं.

४. संजय कपूर

बाॅलिवूडमध्ये कपूर घराण्याचा चांगलाच दबदबा पहायला मिळतो. मात्र संजय कपूरला या वलयाचा फायदा मिळाला नाही. बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोनी व अनिल कपूर यांचा हा भाऊ. १९९५ पासून अभिनयाच्या कारकिर्दीत प्रवेश करूनही संजय यशापासून लांबच राहिले. चित्रपटच नाही तर मालिकेत काम करूनही संजय कपूर बाॅलिवूड सेलिब्रिटी म्हणून नावारूपास आले नाहीत.

५. तुषार कपूर-

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि टीआरपी क्वीन एकता कपूरचा भाऊ आहे, परंतु तरीही तो बॉलिवूडमध्ये कुचकामी ठरला आणि त्याच्या करिअरचा आलेखही चांगला राहिलेला नाही. तुषारने ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले, जे काहीसे यशस्वी ठरले पण त्यानंतर त्याने अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. अजय देवगनचा गोलमाल सिनेमा हा त्याच्यासाठी लकी ठरला, या सिनेमाच्या पुढील भागांमध्ये देखील त्याची वर्णी लागली.

 

६. सोहेल खान

सलमान सारखा भाऊ असतानाही सोहेल अभिनेता म्हणून फ्लाॅपच ठरला. सलमान म्हणेल ती बाॅलिवूडसाठी पूर्व दिशा असं चर्चेत असतं. मात्र सलमानचा भाऊच अभिनेता म्हणून फ्लाॅप ठरला. सोहेलनं पदार्पणाच्या काळात अनेक चित्रपटात अभिनयाची भूमिका बजावली. मात्र त्याचे बहुतांश चित्रपट फ्लाॅप ठरले. सध्या दिग्दर्शक म्हणूनही त्यानं हात आजमवला. जय हो सारख्या बिग बजेट चित्रपटाचा तो दिग्दर्शक राहिला. मात्र सोहेलच नव्हे तर सलमानच्या कारकिर्दीलाही हा सर्वात फ्लाॅप चित्रपट ठरला.

७. अरबाज खान-

सलमान खानचा दुसरा भाऊ अरबाज खानची परिस्थितीही बॉलिवूडमध्ये फारशी चांगली नाही. अरबाजने बर्‍याच वेळा स्वत: ला अभिनेता म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच चित्रपटात केलेल्या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, पण जेव्हा जेव्हा अरबाज मुख्य भूमिका म्हणून काम करत असे तेव्हा त्याची जादू काही चालत नसे. तसं दिग्दर्शक म्हणून अरबाजला यश मिळालं, त्याने सलमानचा दबंग 2 हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

८. फरदीन खान-

अभिनेता फरदीन खान सध्या गायब होऊन आयुष्य जगणार्‍या कलाकारांपैकी एक आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक फिरोज खानचा मुलगा आहे, परंतु त्याच्या अभिनय कारकीर्दीने कधीही यशाच्या उंचीला स्पर्श केला नाही. या अभिनेत्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले, रोमान्सपासून कॉमेडीपर्यंतचे सर्व प्रयत्न केले, पण लोकांची मने तो जिंकू शकला नाही. ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘हे बेबी’ या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.

ट्रेंडिंग बातम्या-

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री

“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!”

20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय?, सामनातून आज पुन्हा एकदा मोदींवर टीकेची झोड

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More