बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवुड स्टार अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई | सध्या देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ही 50 हजारांच्या घरात जाऊन ठेपली आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाचं सावट सध्या दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक अभिनेते आणि सेलिब्रिटी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.

अशातच आपल्या फिटनेस आणि ॲक्टिंगसाठी सुप्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार याने त्याला कोरोना झाला असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. आज सकाळी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून ‘माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी स्वतःला घरातच क्वारंटाईन केलं आहे, त्याचबरोबर कोरोना संबंधीच्या नियमांचं पूर्णपणे पालन करून मी स्वतःची काळजी घेत आहे.’ असं  आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागच्या वर्षी असलेल्या कोरोनापेक्षा यावर्षीचा कोरोना हा अत्यंत घातक असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच आता कोरोनाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारतर्फे नेमून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असतानाच दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

अक्षय कुमार हा कोरोनाचा शिकार झाल्यानंतर त्याने आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याबरोबरच स्वतःची काळजी घ्या आणि मी लवकरच परत येईल, असं आवाहन अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना यावेळी केलं आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला कधी यश येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

थोडक्यात बातम्या

‘ही’ गोष्ट करा तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही, पोलिसांनीच दिला शब्द

विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!

झुम कॉल सुरू असतानाच बड्या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, व्हिडीओ व्हायरल

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More