Kapil Sharma - कपिल शर्मा पुन्हा बेशुद्ध, तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भर्ती
- मनोरंजन

कपिल शर्मा पुन्हा बेशुद्ध, तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भर्ती

मुंबई |  ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणावेळी अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा बेशुद्ध पडला. कपिलला लगेचच अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. 

‘मुबारकां’ सिनेमाच्या प्रमोशनचं चित्रीकरण सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी अभिनेता अर्जुन आणि अनिल कपूर याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, चित्रीकरणादरम्यान कपिलची तब्येत बिघडण्याची ही तिसरी घटना आहे.

कपिलच्या शोचा टीआरपी सध्या चांगलाच कोसळला आहे. त्या तणावातून कपिलची तब्येत सातत्याने बिघडत असल्याची माहिती आहे.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “कपिल शर्मा पुन्हा बेशुद्ध, तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भर्ती

Comments are closed.