Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध डिझायनरनं केला लिंगबदल; सोशल मीडियावर केली पोस्ट

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदेमध्ये झालेल्या एका बदलामुळं सध्या सगळे आश्यर्यचकीत झाले आहेत. स्वप्नीलने ट्रान्सवूमन म्हणजेच पुरुषात्वाचा त्याग करुन स्त्रीत्व स्वीकारलं आहे.

डिझायनर स्वप्नील शिंदेने स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नीलने आता स्वत:चं नाव बदलून ‘साईशा’ असं ठेवलं आहे. त्याच्या या निर्णयामुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो, असं स्वप्नीलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


थोडक्यात बातम्या-

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या