बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंगांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाने केली ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पोलीस दलातीलच काही जणांनी परमबीर सिंग विरोधात खंडणीचे आरोप केल्याने ते अडचणीत सापडले होते. त्यात अनेक दिवसांपासून अज्ञात वासात असलेल्या परमबीर सिंग यांना दणका देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे त्यामुळे सिंग चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

परमबीर सिंग यांच्या विरोधात राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यात पोलीसांना चकवा देत अनेक दिवसांपासून गायब असलेल्या परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फरार घोषित केलं आहे. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. अतिरिक्त महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधिश सुधीर भाजीपाले यांनी हा निर्णय दिला आहे.

सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. न्यायालयाचा आदेश हिंदी, मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाईल पण तरीही ते न्यायालयासमोर आले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या परवानगीसाठी गुन्हे शाखेने अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्जाला मंजूरी दिली तर 30 दिवसांनी फरार घोषित केलेल्या तिघांच्याही संपत्ती जप्तीची कारवाई होऊ शकते.

अँटेलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचे नावं समोर आल्यावर हलगर्जीपणा केला म्हणत सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली केली होती. त्यानंतर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खंडणी वसूलीचे आरोप केले. मात्र त्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरच खंडणीचे आरोप झाले आणि ते अडचणीत सापडले.

थोडक्यात बातम्या-

‘तिची लायकी नाही की…’, विजय वडेट्टीवारांनी भडकून केलं स्फोटक विधान

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम काय?

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More