मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मानं(Anushka Sharma) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळं तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरही तिचे 61 मिलियन पेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत.
अनुष्का चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळं नेहमीच चर्चेत येत असते. परंतु यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आली आहे. नुकताच अनुष्काला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका मिळाला आहे. त्यामुळं सध्या तिच्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहे
झालं असं की, अनुष्कानं विक्री कर आदेशाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. परंतु उच्च न्यायालयाने विक्री कर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. त्यामुळं या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा तिला मोठा झटका मिळाला आहे.
तसेच या याचिका अनुष्कानं स्वत: दाखल न करता कर सल्लागार श्रीकांत वेळेकर यांच्यामार्फत दाखल केल्याबद्दल न्यायालयानं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अनुष्कानं मुलीच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. परंतु आता लवकरच ती ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.