मोठी बातमी! शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवणं आणि खर्चावरून न्यायालयाने शिंदे सरकारला (Shinde Goverment) धक्का दिलाय.
मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग केलं होतं. यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले होते. या प्रकरणी शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका दिला आहे.
शिंदे गटातील BKC दसरा मेळाव्या विरोधात दाखल केलेली याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, बुकिंगसाठी शिंदे गटाने तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले होते. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते.
पहिल्यांदाच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळात झाली होती. एकाच वेळी इतकी मोठी रक्कम कशी देण्यात आली, याबद्दल प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते. तसेच विरोधकांनी देखील यावरून सरकारवर टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.