बॉलिवूडची ‘चांदणी’ पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार….

मुंबई | श्रीदेवीच्या धक्क्यातुन बाहेर येण्यासाठी बोनी कपूर आता श्रीदेवीवर एक डाॅक्युमेंट्री फिल्म काढतोय. श्रीदेवी अचानक गेल्यामुळे जान्हवी आणि खुशीला खुपच धक्का बसला आहे. त्या दोघींसाठी बोनी कपूरने डाॅक्युमेंट्री फिल्म करण्याचं ठरवलंय.

या डाॅक्युमेंट्री फिल्मचं दिग्दर्शन शेखर कपूर करणार आहे. श्रीदेवीचा प्रसिद्ध चित्रपट मिस्टर इंडिया त्यांनीच दिग्दर्शित केला होता, म्हणुन बोनी कपूरने शेखर कपूरची निवड केली आहे.

या डाॅक्युमेंट्री फिल्ममध्ये श्रीदेवीचा खरा आवाज असणार आहे आणि तिचे व्हिडीओही असणार आहे. आता पर्यंत श्रीदेवीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी या डाॅक्युमेंट्री फिल्ममधून कळणार आहे.