मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर झाली. काॅंग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीवरून राज्यात राजकारण तापलं होतं. निकालानंतर आता सर्वस्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्वांच्या निशाण्यावर आले आहेत.
चंद्रकांत पाटील यांना आपल्याच जिल्ह्यात पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवानंतर आता महाविकास आघाडीकडून पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. पाटील यांनी प्रचारावेळी कोल्हापूरात निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. त्यामुळं आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पाटील यांना हिमालयात जाण्याबाबत विचारणा करत आहेत.
आता राष्ट्रवादीकडून पाटील यांच्यासाठी हरिद्वारचे थ्री टायर एसी तिकीट बुक करण्यात आलं आहे. सध्या हे तिकीट सर्वत्र व्हायरल होत आहे. उन्हाळा असल्यानं पाटील यांना त्रास होऊ नये म्हणून एसीचं तिकीट काढल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रवासासोबत जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रतिष्ठेचा सामना रंगला होता. दोन्ही नेत्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांना ओपन चॅलेंज दिले होते. पाटलांच्या या लढाईत सतेज पाटील वरचढ ठरल्याची चर्चा आहे.
थोडक्यात बातम्या –
‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर
“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, तरीही त्यांनी परंपरा पाळली नाही”
“एकटे नाना लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर…”
‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!
“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”
Comments are closed.