Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि सत्तांतर घडवून आणलं. पुढे अजित पवारांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आणि सत्तेत सामिल झाले. मात्र हे जनतेला आवडलं नाही.
महायुतीचे नेते लोकसभा निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याचा दावा करत होते. पण त्यांच्या या दाव्यांमधील हवा निघून गेली आहे. कारण महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे. अशात आता अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?
अजित पवार-एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बूमरँग होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. म्हणजे शिंदे गटाचे खासदार, आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील आणि अजित पवार गटातील आमदार देखील शरद पवारांकडे परततील, असा दावा केला जात आहे.
सध्याची ही परिस्थिती पाहता येत्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील, असा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार स्वगृही परतणार?
काही आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर शरद पवार गटाते नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढच सांगतो. याबद्दल आम्ही आताच काही भाष्य करणार नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून लोकांची मनस्थिती बदलली आहे. त्यामुळे मी त्यावर आताच काही बोलणार नाही. सध्या फार घाई करणं योग्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
सध्या थोडा वेळ जाऊद्या. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या मताची फार काळजी आहे. आमचे अनेक आमदार गेले पण आज जनतेने लोकसभा निवडणुकीत हा निकाल दिला. आम्ही योग्य वेळी योग्य ते करू, असं जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”
निकालानंतर अजित पवार गप्पच; आमदारांची धाकधूक वाढली, मोठा निर्णय घेणार?
“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट
राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव