Happy Hormones l मुंबईमध्ये (Mumbai) आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी ‘हॅप्पी हार्मोन्स’ (Happy Hormones) महत्त्वाची भूमिका बजावतात. ही हार्मोन्स मेंदूमध्ये तयार होणारी विशिष्ट रसायने आहेत. ती योग्य प्रमाणात तयार झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहते. ताणतणाव, नैराश्य आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी ‘हॅप्पी हार्मोन्स’ सक्रिय करणे गरजेचे आहे, यावर तज्ज्ञ भर देत आहेत.
हॅप्पी हार्मोन्सचे कार्य :
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांमध्ये ताण, तणाव आणि चिडचिड वाढलेली दिसते. ‘हॅप्पी हार्मोन्स’ संदेशवाहक म्हणून काम करतात आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करतात. यामध्ये नॉरॲड्रेनालाईन, डोपामाइन (Dopamine), सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि फेनिलेथिलामाइन यांचा समावेश होतो.
‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत? :
नियमित व्यायाम: नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तसेच आवडती गाणी ऐकणे, यांसारख्या गोष्टी ‘हॅप्पी हार्मोन्स’ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
सकारात्मक दृष्टिकोन: चांगल्या आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात वेळ घालवणे, ध्यानधारणा करणे, यांसारख्या गोष्टींमुळेही ‘हॅप्पी हार्मोन्स’ शरीरात तयार होण्यास मदत होते.
सामाजिक संबंध: मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे, हसणे, गप्पा मारणे यांसारख्या साध्या गोष्टीदेखील ‘हॅप्पी हार्मोन्स’साठी महत्त्वाच्या ठरतात.
तणाव कसा कमी करावा?
तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. मनःशांतीसाठी ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरते. लोकांनी मोबाईल, लॅपटॉप (Screen Time) वापर कमी करून मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
डोपामाईन: मेंदूच्या बक्षीस प्रणालीमध्ये प्रेरक भूमिका बजावते.
ऑक्सिटोसिन: प्रेम आणि विश्वासाशी संबंधित असते.
एंडोर्फिन: तणाव आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास: रंगरंगोटी अंतिम टप्प्यात वरळीतील बीडीडी (BDD) चाळींच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. ५५० कुटुंबांना यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरांचे वाटप करण्याचे नियोजन म्हाडाने (MHADA) केले आहे. त्यानुसार, इमारतींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.