बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

सिडनी | दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. omicron ला रोखण्यासाठी सर्वच स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत.

जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने झाले असतील तर बुस्टर डोस (Booster Dose) घ्यायला काहीच हरकत नसल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. यामुळे कोरोनापासून अतिरिक्त संरक्षण मिळत असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia) येथे केलेल्या एका अध्ययनातून ही माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरूवातीच्या आकडेवारीवरून फायझरचा बुस्टर डोस ओमिक्रॉनपासून संरक्षण देऊ शकतो. हा डोस लसीच्या पहिल्या दोन डोस प्रमाणेच कोरोनापासून संरक्षण करतो, असं या अहवालात नमूद आहे.

दरम्यान, एका डोसची प्रतिकार क्षमता दिर्घकालीन नसते. तसेच, लसीचा दुसरा डोस घेतल्यावर सहा महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी शरीरातील अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे कोरोना विरोधात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बुस्टर डोस महत्वाचा समजला जातो.

थोडक्यात बातम्या-

“दादा बघा, दादा बघा…अरे दादाला इथली अंडी पिल्लं माहितीये”, अजित पवारांची टोलेबाजी

“साथियो, सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है”, मलिकांच्या ट्विटने खळबळ

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More