बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला आता ‘बाबूराव गणपतराव आपटे’ पात्रातून सुटका हवी आहे”

मुंबई | हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेते परेश रावल यांनी सर्वांना खळखळून हसवले होते. परेश रावल यांची हेरा फेरीमधील भूमिका आजही तरूण सोशल मीडियावर अपलोड करत असतात. 21  वर्षांचा काळ लोटल्यानंतरही त्यांची ही भूमिका अजारमर ठरली आहे. मात्र, आता बाबुराव गणपतराव आपटे या भूमिकेबाबत परेश रावल यांनी एक वक्तव्य केलं आहे.

फिर हेरा फेरी चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमिका वठवली  होती. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटानंतर तिसरा भाग कधी येणार आहे, हा प्रश्न विचारला जात आहे. त्यावरून आता बाबूरावच्या भूमिकेला कंटाळलो आहे, असं मत परेश रावल यांनी व्यक्त केलं  आहे. या फ्रेंचायझीमधून परेश रावल यांनी काढता पाय घेतला आहे.

2000 साली प्रियदर्शन यांनी हेरा फेरी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर फिर हेरा फेरी हा नीरज वोहरा यांनी प्रदर्शित केला होता. हेरा फेरी मध्ये जे काही घडल त्यावेळी आम्ही निरागस होतो. परंतु, त्यानंतर दुसऱ्या भागात खुप हुशारी दाखवत होतो. आता बाबूराव गणपतराव आपटे नको तोच तो पणाचा कंटाळा आला आहे, असंही परेश रावल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या  तिसऱ्या हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे. परंतु जेव्हाही असं होत त्यावेळेस  एखाद्या पात्राला निरागसतेची आवश्यकता असते. तिथे ती नव्हती, तिेथेच चुक झाली. आता मला या पात्रातुन सुटका हवी आहे, असं परेश रावल यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण

‘जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी…’; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

पाकिस्तानची चिंता वाढली! ‘या’ 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

“ठाकरे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More