इंग्लंडचे पंतप्रधान बोरेस जॉन्सन यांना ICU मध्ये हलवलं; 27 मार्चला कोरोना रिपोर्ट आला होता पॉझिटीव्ह
नवी दिल्ली | ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना गेल्या 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 27 मार्च कोरोनाची लागण झाली आहे. आता मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.
जॉन्सन यांना अगोदर डाऊनिंग स्ट्रीटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्या जागेवरून ते ब्रिटनचं काम पाहत होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमेनिक राब काम पाहणार आहेत.
लक्षणं कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या करून घेण्यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते त्यांचं रूटीन चेकअप होतं. त्यांनी रूग्णालयातून काही ब्रिटीश जनतेसाठी काही ट्विट देखील केले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी मी रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेलो. कारण आजही मला कोरोनाची लक्षणे आहेत. मी माझ्या टीमशी संपर्कात आहे, कारण आपण एकत्र या व्हायरसशी लढा देऊ आणि सर्वांना सुरक्षित ठेवू, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन
‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाउन म्हणजे नोटाबंदीपेक्षा मोठी चूक- कमल हसन
मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस- अजित पवार
कोरोनासंदर्भात मोठा निर्णय; आता पुण्यातील ‘हे’ भाग होणार सील
Comments are closed.