Top News

कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान; बोरिस जॉन्सन यांच्याकडून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

लंडन | कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे.

जॉन्सन यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी हा लॉकडाऊन बुधवारपासून लागू होईल अशी घोषणा केली आहे. स्कॉटलंडने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनीही संपूर्ण इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केलीय. बुधवारपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे.

इंग्लंडमधील विविध रुग्णालयात सोमवारी जवळपास 27 हजार कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांपेक्षा 40 टक्के अधिक आहे.

गेल्या मंगळवारी अवघ्या 24 तासांत 80 हजाराहून अधिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचंही जॉन्सन यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR दाखल!

‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकाराल का?’; नाना म्हणाले…

औरंगाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या- प्रकाश आंबेडकर

“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”

“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या