बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् इंग्लंडचे पंतप्रधान पडले जेसीबीच्या प्रेमात; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल सांगत येत नाही. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमांना आणि स्थळांना भेटी देत आहेत. जॉन्सन यांचा हा पहिलाच दौरा असून दोन दिवस ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीत फक्त बुलडोजरची हवा पहायला मिळाली होती. भले-भले यंत्र ज्या बुलडोजरसमोर मान खाली टाकतात त्याच्या प्रेमात आता बोरिस जाॅन्सन देखील पडले आहेत. अहमदाबादमधील काही कार्यक्रम आटोपल्यानंतर जाॅन्सन यांनी थेट जेसीबीच्या कारखान्याला भेट दिली आणि फोटोशुट केलं.

जेसीबी कंपनी ही भारतातील लोकप्रिय बुलडोजर कंपनी आहे. ब्रिटनच्या या कंपनीला भेट दिल्यानंतर जाॅन्सन यांनी थेट जेसीबीवर चढून पाहणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर जाॅन्सन यांचे जेसीबीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. अशात अनेकांनी विविध कलात्मक कॅप्शन देखील दिले आहेत.

दरम्यान, बोरिस जाॅन्सन यांनी दोन दिवसीय गुजरात दौऱ्याची सुरूवात केल्यानंतर गांधीजींच्या साबरमती आश्रमाला देखील भेट दिली आहे. अक्षरधाम मंदिरात पुजाऱ्यांसोबत फिरताना जाॅन्सन यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर…”, जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

“कधीही निवडणुका घ्या, विजय आमचाच होणार…सत्ता भाजपचीच येणार”

अमोल मिटकरींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत मनसेचं जोरदार प्रत्युत्तर; पाहा व्हिडीओ

महागाईवर ‘ऑल इस वेल’ म्हणणाऱ्या अर्थमंत्री सीतारामण यांच्यावर राष्ट्रवादीची जोरदार टीका!

“मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच…”, नवनीत राणा कडाडल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More