बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ‘राष्ट्रीय नेतृत्व’ करण्याची क्षमता”

मुंबई | येत्या शुक्रवारी शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख यावेळी कोणती राजकीय भूमिका मांडणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

आज राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याची सव्याज परतफेड केली जाणार आहे. राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे 2024 मध्ये देशाचं राजकारण पूर्णपणे बदललेलं असणार. राष्ट्रीय राजकारणात वेगळा सूर्य तुम्हाला तळपताना दिसेल. त्यामुळे आता तुम्हाला कितीही उपदव्याप करायचे असतील, ते आता करून घ्या. कारण तुमचा पैसा, तुमची दहशत, तुमची कपटनिती 2024 मध्ये काम करणार नाही. शिवसेना केंद्रात सर्वोच्च स्थानी असेल आणि राष्ट्रीय राजकारणात महत्वाचा मोहरा असेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

राज्यात सुरू असलेल्या प्रकाराला सुडाचं महाभारत म्हणतात. आम्ही आमच्या पक्षाला विचार मांडतो, आमची भूमिका मांडतो हे भाजपला मान्य नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून नेत्यांवर दहशत निर्माण करायची. परंतु आमच्या पाठीला कणा आहे त्यामुळे मोडू पण वाकणार नाही. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे इतिहास आहे, हे लक्षात घ्या, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात सध्या ईडी, सीबीआय आयकर विभाग,एनसीबी अशा तपास यंत्रणा भोवती राज्यकीय वातावरण फिरताना दिसत आहे. त्यावरून संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More